ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात वातावरणातील आद्रतेमुळे केसांच्या वाढीवर गंभीर परिणाम होतो.
पावसाळ्यात केसामध्ये ओलावा बऱ्याचवेळा तसाच रहातो ज्यामुळे केसांमधून दुर्गंधी येते.
पावसाळ्यात केसांना शॅम्पू किंवा तेल लावले तरी सुद्धा केस चिकट आणि कोरडे होतात.
केसांमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी या घरगुती पदार्थांचा वापर करा.
केस धूताना त्यामध्ये थोडा लिंबाचा रस टाका ज्यामुळे केसांमधील दुर्गंधी दूर होईल.
केसांवर टी ट्री ऑइल वापरल्यामुळे केसांमधील दुर्गंधी निघून जाईल.
केसांना आलं पुदिन्याचे पाणी लावल्यामुळे केसगळतीची समस्या होईल दूर.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.