ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ खराब होतात.
वातावरणातील आद्रतेमुळे अर्ध्या कापलेल्या भाज्या किंवा फळे खराब होतात.
स्वयंपाकघरातील भाजीपाला आणि पदार्थ चांगले ठेवण्यासाठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो.
पावसाळ्यात तांदळाच्या डब्यात टिश्यूमध्ये आले, लसूण आणि वेलची घालून ठेवा यामुळे तांदूळ खराब होणार नाही.
केळी पाण्याने धुवा त्यानंतर टिश्यू पेपर ओला करून देठावर गुंडाळा, यामुळे केळी २ आठवडे खराब होत नाही.
टरबूजमध्ये लसूण ठेवून फॉईल पेपरनी झाकून ठेवा यामुळे टरबूज लवकर खराब होणार नाही.
टोमॅटोच्या तुकड्यावर किंवा टोकाला टेप लावून झाकून ठेवा यामुळे टोमॅटो जास्त दिवस टिकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.