Manasvi Choudhary
दातदुखीचा त्रास कधीकधी खूपच त्रासदायक होतो. दातदुखीच्या वेदना आणि त्रास कमी करण्यासाठी घरगुती सोपे उपाय करा
घरगुती पदार्थाने तुम्ही दातदुखींवर उपाय करू शकता.
दातदुखी वेदनेच्या ठिकाणी कापूर ठेवल्यास आराम मिळेल.
कांदामध्ये अँटीबॅक्टीरिअल गुणधर्म असतात. कांद्याचा तुकडा दात दुखत असलेल्या ठिकाणी ठेवा.
लसणामध्ये अँटीबॅक्टीरिअल गुणधर्म असतात. लसणाची पाकळी बारीक करून त्यामध्ये मीठ टाकून हे मिश्रण दात दुखणाऱ्या ठिकाणी लावा.
एक कप कोमट पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून, या पाण्याने थोडावेळ गुळणा करा. दातदुखीचा त्रास कमी होईल.
कीड लागल्यामुळे वेदना होत असल्यास पेरूच्या झाडाची ४-५ पाने पाण्यामध्ये उकळून, या पाण्याने गुळणा करा. पान चावल्यासही आराम मिळेल.
अद्रकमध्ये अँटीबॅक्टीरिअल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणामुळे वेदना आणि सूज कमी होते. अद्रकाची पेस्ट लावावी किंवा अद्रक चघळावे.
तुरटीची पावडर वेदना असलेल्या ठिकाण ठेवा. लाळ बाहेर थुकत राहा. तुरटीच्या पाण्याने गुळणा केल्यासही आराम मिळेल.
लवंगमध्ये युजेनॉल असते, जे वेदनेपासून आराम देते. वेदनेच्या ठिकाणी लवंगाचे तेल लावावे किंवा लवंग दातांमध्ये दाबून ठेवावी.