Dhanshri Shintre
तिरंगा आपल्या देशाच्या अस्मितेचा आणि सन्मानाचा प्रतीक आहे. त्याचा आदर राखणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, विशेषतः पोशाखांमध्ये तिरंगा वापरताना योग्य नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
तिरंग्याचा मान राखण्यासाठी त्याचा योग्य उपयोग आणि सन्मान करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. त्याचे प्रतीकात्मक महत्त्व ओळखून त्याचा आदर राखणे गरजेचे आहे.
कधी कधी अनोखी फॅशनच्या प्रयत्नात अशा चुका घडतात, ज्यामुळे नकळत राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. त्यामुळे तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा थीमचा पोशाख परिधान करताना, राष्ट्रध्वजाशी संबंधित नियम जाणून घेणे आणि त्याचा योग्य सन्मान राखणे प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक आहे.
लोक अनेकदा तिरंग्याचे रंग चुकीच्या क्रमाने घालतात, हे टाळा. तिरंग्यात केशरी वर, मधे पांढरा आणि खाली हिरवा रंग हा क्रम नेहमी पाळला पाहिजे.
तुमचा पोशाख तिरंग्याच्या योग्य मांडणीसह असावा. तसेच कपडे स्वच्छ आणि डागमुक्त असणे महत्त्वाचे आहे.
तिरंग्याचा पोशाख कधीही पायांजवळ येणार नाही याची काळजी घ्या, कारण यामुळे तिरंग्याच्या सन्मानाचा अपमान होऊ शकतो. योग्य सन्मान राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
तिरंग्याचा पोशाख देशभक्तीचे प्रतीक आहे, त्यामुळे तो आदराने आणि नीटनेटके परिधान करा. वापरून झाल्यावर कुठेही न फेकता त्याचा सन्मान राखणे अत्यावश्यक आहे.