ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कडक उन्हामुळे हिट स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. यासाठी शरीराला आतून थंडावा देण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा.
शरीरात पाण्याची कमतरता वाढल्याने हिट स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो. यासाठी भरपूर पाणी प्या. आणि शरीराला हायड्रेटेड ठेवा.
उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला आतून थंडावा मिळतो.
उन्हाळ्यात नारळ पाणी, संत्री, कलिंगड सारखी ताजी फळं खा. हे शरीराला थंड ठेवण्यासह शरीरात पाण्याची कमतरता भासून देत नाही.
माथ्यावर, मानेवर, आणि पायावर थंड पाण्याची पट्टी ठेवा. यामुळे कडक उन्हात शरीराला थोडा थंडावा मिळेल.
आवळा आणि तुळसीच्या पानाचे रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसेच हे शरीराला हीट स्ट्रोकपासून वाचवतो.
काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. म्हणून उन्हाळ्यात काकडीचे सेवन करा. यामुळे शरीर हायड्रेटेड राहील.