Manasvi Choudhary
कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
पाणी उकळताना त्यामध्ये ओवा आणि बडीशेप टाकून पाणी उकळावे. त्यानंतर त्याचे सेवन करावे.
थडीत तोंडाला चव नसते त्यामुळे तांदळाची पेज, डाळीचे पाणी, सूप यासारख्या पदार्थाचे सेवन करावे. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढते.
आहारामध्ये नाश्त्याला मिश्र डाळीची धिरडी, अंड्यातले पांढरे पनीर या पोषक पदार्थाचा समावेश करा.
चमचीत, मसालेदार आणि तिखट पदार्थ खाणं शक्यतो टाळा.
जास्तीत जास्त फळे खा. फळे ही धुवून खा.
बेकरीचे पदार्थ, बिस्कीट, ब्रेड, पाव यासारखे मैदायुक्त पदार्थ खाऊ नका.
गरम आणि ताजे अन्न खा. बाजारातील पॅकबंद केलेले आणि प्रिझर्व्हेटिव्ह पदार्थ खाऊ नका.