Manasvi Choudhary
रात्री झोपण्यापूर्वी आपण जे काही करतो त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. अनेकांना रात्री मोबाईल , टिव्ही पाहण्याची वाईट सवय असते.
सकाळी मूड फ्रेश पाहिजे असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी या ५ सोप्या गोष्टी नक्की करा
सकाळी उठल्यावर "आज काय करायचंय?" या प्रमाणे दिवसभराच्या कामांचे नियोजन करा म्हणजे वेळ आणि कामाची धावपळ होणार नाही.
झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेवून द्या त्याऐवजी पुस्तक किंवा संगीत ऐका.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि पचन सुधारते.
शरीरातील स्नायू मोकळे करण्यासाठी हलके स्ट्रेचिंग करा किंवा फक्त ५-१० मिनिटे ध्यानाला बसा.
गरम पाण्याने अंघोळ करा किंवा पाय स्वच्छ धुवा यामुळे शरीराची स्वच्छता होते व शांत झोप लागते.