Shreya Maskar
फोडणीचा भात बनवण्यासाठी उरलेला भात, जिरे, मोहरी, पावभाजी मसाला, लसूण, कढीपत्ता, कांदा, हळद, लाल तिखट, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
फोडणीचा भात बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता आणि कांदा व्यवस्थित परतून घ्या.
कांदा गुलाबी झाल्यावर त्यात लाल तिखट, गरम मसाला , पावभाजी मसाला घालून एकजीव करा.
या मिश्रणात आता उरलेला भात घालून मिक्स करा.
शेवटी यात कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला.
गरमागरम फोडणीच्या भाताचा लोणच्यासोबत आस्वाद घ्या.
फोडणीचा भात अधिक चवदार बनण्यासाठी तुम्ही यात भिजवलेली चण्याची डाळ देखील घालू शकता.
तसेच यात लिंबू, टोमॅटो, मोहरी, जिऱ्याची फोडणी देखील देऊ शकता.