Manasvi Choudhary
पावसाळ्यात घराची स्वच्छता राखणे अत्यंत महत्वाचे आहे. पावसाळ्यात लादी पुसल्यानंतर चिकट राहते. स्वच्छ करण्याची चुकीची पद्धत किंवा चुकीचे क्लिनर यामुळे लादी चिकट होऊ शकते.
यासाठी तुम्ही लादी पुसण्याच्या पाण्यात स्वयंपाकघरातील योग्य घटक मिसळले तर चिकटपणा दूर होण्यास मदत होईल.
लादी पुसण्याच्या पाण्यात व्हाईट व्हिनेगर मिक्स करा यामुळे साबण किंवा क्लिनर मुळे साचलेला थर तसचे चिकटपणा कमी होतो.
लाकडी किंवा संगमरवरी फरशीवर व्हिनेगर वापरणे टाळावे यामुळे लादी खराब होऊ शकते.
अनेकांना असे वाटते की जास्त क्लिनर टाकल्याने लादी स्वच्छ होते मात्र हे चुकीचे आहे. जास्त क्लिनर टाकल्याने धूळ आणि घाण आकर्षित होते .
एकदा लादी पुसल्यानंतर त्याच त्याच पाण्याने पुसत असाल तर घाण लादीवर पुन्हा पसरते. पाणी घाण झाल्यावर लगेच बदलणे महत्वाचे आहे. प्रत्येक वेळी स्वच्छ पाणी वापरा.
अनेकजण क्लिनरने एकदाच लादी पुसतात मात्र असे करणे चुकीचे आहे. क्लिनरनंतर साध्या पाण्याने पुन्हा लादी स्वच्छ पुसा.
मॉप आधीचे घाणेरडा असेल तर तो फरशी स्वच्छ करण्यासाठी वापरू नका यामुळे फरशीवर तेलकटपणा, चिकटपणा साचतो. प्रत्येक वेळी फरशी पुसण्यापूर्वी मॉप स्वच्छ धुवा.