Dhanshri Shintre
फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज सेलची घोषणा केली असून, हा भव्य सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, ज्यात ग्राहकांना जबरदस्त सवलतींचा लाभ मिळणार आहे.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने काही स्मार्टफोनवरील आकर्षक ऑफर्सची झलक जाहीर केली असून, त्यात गुगलचा हा दमदार स्मार्टफोन खास सवलतीत उपलब्ध होणार आहे.
फ्लिपकार्ट सेलमध्ये गुगल पिक्सेल ९ अर्ध्या दरात मिळणार आहे. मागील वर्षी लाँच झालेला हा स्मार्टफोन यावेळी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध असेल.
कंपनीने या स्मार्टफोनचा टीझर सादर केला असून, तो मागील वर्षी ₹७९,९९९ च्या सुरुवातीच्या किमतीसह बाजारात लाँच करण्यात आला होता.
फ्लिपकार्ट सेलमध्ये हा स्मार्टफोन केवळ ₹३४,९९९ मध्ये मिळणार आहे, ज्यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट उपलब्ध असेल.
₹७९,९९९ ला लाँच झालेला हा स्मार्टफोन सेलमध्ये ₹३७,९९९ ला मिळेल, त्यावर ₹२,००० बँक डिस्काउंट आणि ₹१,००० एक्सचेंज बोनसही मिळणार आहे.
हा स्मार्टफोन बँक डिस्काउंट आणि खास ऑफर्ससह स्वस्तात मिळणार आहे. सध्या पिक्सेल ९ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ₹६४,९९९ किंमतीत उपलब्ध आहे.
बँक डिस्काउंट किंवा एक्सचेंज बोनस न मिळाल्यासुद्धा, तुम्ही हा स्मार्टफोन त्याच्या मूळ किमतीच्या अर्ध्यापेक्षा कमी दरात खरेदी करण्याची संधी मिळवू शकता.
मर्यादित काळासाठी उपलब्ध असलेल्या या ऑफरमध्ये OLED डिस्प्ले, टेन्सर G4 प्रोसेसर, 50MP + 48MP मागील आणि 10.5MP फ्रंट कॅमेरा असलेला स्मार्टफोन मिळणार आहे.