Dhanshri Shintre
एअरटेल प्रीपेड ग्राहकांसाठी कंपनीने Amazon Prime Lite सह एक स्वस्त प्लॅन लाँच केला आहे, ज्यामुळे पैसे वाचवता येतील.
एअरटेलचे Amazon Prime प्लॅन आता ८३८ रुपयांत उपलब्ध आहे, चला पाहूया या प्लॅनमुळे ग्राहकांना कोणते फायदे मिळतील.
या प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ ग्राहकांना मिळतो.
८३८ रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५६ दिवसांसाठी वैधता मिळेल, ज्याद्वारे डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येईल.
या प्लॅनमध्ये २२ पेक्षा जास्त ओटीटी, ५६ दिवसांसाठी Amazon Prime Lite आणि ३० दिवसांसाठी १ मोफत HaloTune मिळेल.
जिओने Amazon Prime Lite प्लॅन लाँच केला आहे, ज्याची किंमत १,०२९ रुपये आहे आणि ग्राहकांना विशेष फायदे मिळतील.
या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता असून, Amazon Prime Lite, दररोज २GB डेटा, १०० SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो.