Siddhi Hande
विमानाने रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. रोज अनेक विमाने उड्डाणे घेतात.
विमानाने प्रवास करताना कोणतं विमान कुठे जाणार हे कोठ ठरवतं, तुम्हाला माहितीये का?
विमान कुठे आणि कधी जाणार हे एअरलाइन कंपनी आणि विमानतळ नियंत्रण ठरवते.
फक्त एवढेच नाही तर इतर अनेक घटकांवर विमानाचे उड्डाण अवलंबून असते. त्याच्या आधारावर विमान कुठून कुठे आणि कधी जाणार हे ठरवले जाते.
विमान कंपनी प्रवाशांची मागणी, मार्ग आणि उपलब्ध असलेले विमान याचा विचार करते. याचसोबत वेळेचे नियोजन करुनच विमानाचा टायमिंग ठरवला जातो.
विमान कंपनी प्रवासाचा मार्गदेखील ठरवले. किती विमाने, प्रवासी संख्या यावर कोणते विमान वापरले जाणार हे ठरवले जाते.
एअरलाइन एका विशिष्ट मार्गावर विशिष्ट प्रकारची विमाने वापरु शकते. लांब अंतरासाठी मोठी विमाने वापरली जातात.
याचसोबत हवामानाची स्थिती, सुरक्षिततेचे नियम पाळून विमानाच्या उड्डाणाचा वेळ पुढे-मागे होऊ शकतो.