Shreya Maskar
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जवस फायदेशीर ठरते.
अळशीच्या बिया म्हणजेच जवस होय.
अळशीच्या बिया, हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि कांदा इत्यादी साहित्य जवसाची चटणी बनवायला लागते.
जवसाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम जवस भाजून त्याची पावडर तयार करा.
या पावडरमध्ये हिरवी मिरची, लिंबाचा रस आणि चिरलेला कांदा टाकून मिक्स करून घ्या.
आता या पावडरमध्ये पाणी घालून छान पेस्ट करून घ्या.
या चटणीचे नियमित भात किंवा चपातीसोबत सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहील.
जवसाची चटणी हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवा.