Shruti Vilas Kadam
फ्लॅक्स सीड्समध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
अळशी खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
फ्लॅक्स सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असतात. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि हृदय निरोगी राहते.
अळशीचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होते, विशेषतः मधुमेहींसाठी उपयुक्त ठरते.
फ्लॅक्स सीड्समधील अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्समुळे केस मजबूत होतात, गळती कमी होते आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते.
अळशीमध्ये लिग्नन्स असतात, जे हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. महिलांसाठी विशेषतः फायदेशीर मानले जातात.
फ्लॅक्स सीड्समधील पोषक घटक शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करतात, त्यामुळे आजारांपासून संरक्षण मिळते.