Shreya Maskar
जवसाची चटणी बनवण्यासाठी जवसाचे दाणे, लसूण, जिरे, लाल तिखट, मीठ, हिंग इत्यादी साहित्य लागते.
जवसाची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम जवसाचे दाणे स्वच्छ धुवा.
पॅनमध्ये जवस मंद आचेवर भाजून थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घ्या.
त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात लसूण , जिरे, हिंग, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून पेस्ट बनवा.
एका बाऊलमध्ये वाटलेला मसाला आणि जवस पावडर घालून मिक्स करा.
तयार जवसाची चटणी हवाबंद डब्यात भरून ठेवा.
भात आणि भाकरी सोबत जवसाची चटणीचा आस्वाद घ्या.
नियमित जेवणात जवसाची चटणीचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.