Shruti Vilas Kadam
शशांकासनामुळे पाठीला ताण मिळतो आणि शरीराला आराम मिळण्यास मदत होते. या आसनात आधी गुडघ्यांवर बसून शरीर पुढे झुकवावे आणि कपाळ जमिनीला टेकवावे. नंतर मूळ स्थितीत यावे.
भुजंगासनामुळे पाठीचे स्नायू मजबूत होण्यास आणि शरीराची लवचिकता वाढण्यास मदत होते. आसन करताना पोटावर झोपून तळहात खांद्याजवळ ठेवावेत. श्वास घेत छाती हळूहळू वर उचलावी.
या आसनामुळे शरिर मजबूत होते. दोन्ही हात जमिनीवर ठेवून पाय मागे सरळ करावेत. डोके, पाठ आणि पाय एका रेषेत ठेवून सामान्य श्वास घ्यावा. ३० सेकेंद प्लँक करा.
साइड प्लँकमुळे पोटाचे, खांद्याचे स्नायू मजबूत होतात. एका हातावर आणि पायाच्या बाजूवर शरीराचा भार ठेवून कंबर वर उचलावी. सुरुवातीला हा प्रकार अवघड वाटल्यास गुडघे जमिनीवर ठेवून प्लँक करावे.
नौकासन हे कोअर स्नायू मजबूत केले जाते. जमिनीवर बसून गुडघे वाकवावेत आणि पाय हळूहळू वर उचलावेत. शरीराचा समतोल राखत हात पुढे सरळ ठेवावेत. सुरुवातीला गुडघे वाकवून हे आसन करावे.
या आसनामुळे पाठीचे स्नायू मजबूत होतात. पाठीवर झोपून गुडघे वाकवावेत आणि पाय जमिनीवर ठेवावेत. त्यानंतर कंबर हळूहळू वर उचलून काही सेकंद थांबावे आणि पुन्हा खाली आणावी.
त्रिकोणासनामुळे कंबर, पायांना ताण मिळतो. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून उभे राहावे. एका बाजूला झुकून हात पायाच्या दिशेने न्यावा आणि दुसरा हात वर सरळ ठेवावा. हे आसन दोन्ही बाजूंनी करावे.