Boiled Egg vs Omelette: उकडलेली अंडी की ऑम्लेट? आरोग्यासाठी चांगलं काय?

Shruti Vilas Kadam

उकडलेल्या अंड्यामध्ये किती प्रोटीन असते?

एका उकडलेल्या अंड्यामध्ये साधारण ६ ते ६.३ ग्रॅम प्रोटीन असते. यामध्ये शरीराला आवश्यक असणारी अमिनो अॅसिड्स मिळतात. स्नायूंची दुरुस्ती आणि वाढ यासाठी प्रोटीन महत्त्वाचे असते.

boiled eggs for breakfast benefits | Google

ऑम्लेट खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का?

ऑम्लेटमध्येही अंड्याइतकेच प्रोटीन मिळते. मात्र, ते बनवताना किती तेल, बटर, चीज किंवा इतर पदार्थ वापरले जातात, यावर त्यातील कॅलरी आणि फॅटचे प्रमाण अवलंबून असते.

Boiled Egg vs Omelette

वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय फायदेशीर?

वजन कमी करण्यासाठी कॅलरीचे प्रमाण नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे असते. उकडलेल्या अंड्यामध्ये अतिरिक्त तेल किंवा बटर घालावे लागत नाही. त्यामुळे उकडलेल्या अंड्यामध्ये कमी कॅलरीत भरभरून प्रोटीन मिळतात.

boiled eggs vitamins | saam tv

ऑम्लेटमध्ये भाज्या घालण्याचे फायदे

ऑम्लेट बनवताना कांदा, टोमॅटो, पालक, ढोबळी मिरची आणि मशरूम यांसारख्या भाज्या घालता येतात. यामुळे जेवताना फायबर, जीवनसत्त्वे मिळताता. भाज्यांमुळे जेवण अधिक पौष्टिक होते.

Omelette

अंड्यामध्ये कोणती जीवनसत्त्वे असतात?

अंड्यामध्ये प्रोटीनसोबत व्हिटॅमिन बी१२, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए आणि कोलीनसारखे पोषक घटक असतात. हे घटक हाडांचे आरोग्य आणि वजन कमी करण्याचे काम करतात.

2 boiled eggs fat | saam tv

ऑम्लेट बनवताना कोणती काळजी घ्यावी?

ऑम्लेट बनवताना जास्त तेल, बटर, चीज आणि प्रक्रिया केलेले मांस वापरणे टाळावे. यामुळे कॅलरी, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण वाढू शकते.

Boiled Egg vs Omelette

उकडलेले अंडे की ऑम्लेट?

कमी कॅलरी आणि अतिरिक्त फॅट टाळायचे असल्यास उकडलेले अंडे चांगला पर्याय आहे. तर भाज्यांसह तयार केलेले कमी तेलातील ऑम्लेटदेखील पौष्टिक ठरू शकते.

Boiled Egg vs Omelette for Weight Loss | google

Rajma vs Chole: राजमा की छोले, सर्वाधिक प्रोटिन कशात? उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल

Rajma vs Chole | Saam Tv
येथे क्लिक करा