Early Cancer Signs in Legs: शरीरात कॅन्सरची गाठ तयार होत असताना पायांमध्ये दिसतात 5 मोठी लक्षणं

Surabhi Jayashree Jagdish

पायांमध्ये सतत सूज येणं

पायांमध्ये सतत सूज येणं हे कधी कॅन्सरचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. विशेषतः लिंफ नोड्स ब्लॉक झाल्यास द्रव साचून सूज वाढते. ही सूज एका किंवा दोन्ही पायांमध्ये दिसू शकते आणि दिवसेंदिवस वाढत जाते.

leg swelling causes | SAAM TV

पायदुखी

पायांमध्ये सतत राहणारी वेदना ही हाडांमध्ये कॅन्सर किंवा त्याचा प्रसार झाल्याचं लक्षण असू शकते. ही वेदना विश्रांतीतही कमी होत नाही आणि वाढत जाते. साध्या वेदनाशामक औषधांनीही ही वेदना कमी होत नाही.

persistent leg pain | SAAM TV

पायांमध्ये मुंग्या येणं

पाठीच्या कण्यावर किंवा पेल्विक भागावर कॅन्सरचा दबाव आल्यास नसांवर परिणाम होतो. त्यामुळे पायांमध्ये मुंग्या येणं, झिणझिण्या किंवा सुन्नपणा जाणवतो. काही वेळा चालताना पाय ओढत चालावं लागतं.

numbness in legs | SAAM TV

पायात गाठ

सॉफ्ट टिश्यू सारकोमा प्रकारच्या कॅन्सरमध्ये पायात गाठ तयार होऊ शकते. ही गाठ सुरुवातीला वेदनारहित असते. पण ती हळूहळू वाढत जाते.

tingling in legs | SAAM TV

त्वचेमध्ये बदल

त्वचेवरील कॅन्सर पायांवरही दिसू शकतो. यात मोल्सचा रंग, आकार किंवा रूप बदलू शकतो. नवीन जखमा तयार होणे हेही लक्षण असू शकते.

bone cancer symptoms | SAAM TV

पायात क्रॅम्प येणं

रक्तवाहिन्यांवर किंवा लिंफ नोड्सवर कॅन्सरचा दबाव आल्यास रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे पायांमध्ये जडपणा आणि क्रॅम्प्स जाणवतात. असावेळी चालताना लवकर थकवा येतो.

soft tissue sarcoma signs | SAAM TV

लक्षणं दीर्घकाळ टिकणं

कॅन्सरची पायांमधील लक्षणं हळूहळू वाढतात आणि कमी होत नाहीत. सुरुवातीला ती साध्या आजारांसारखी वाटतात त्यामुळे अनेकदा दुर्लक्ष होतं. जर ही लक्षणं काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकली तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

leg cramps causes | SAAM TV

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

Raigad fort history | saam tv
येथे क्लिक करा