ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा असो किंवा पावसाळा, तेलकट त्वचा खूप चिकट होते. चेहरा नेहमी तेलकट दिसतो.
तेलकट त्वचेमुळे पिंपल्स आणि सुरकुत्यांसारख्या त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
जेव्हा तुमची त्वचा तेलकट असते, तेव्हा मेकअप केल्यावरही तुम्हाला पूर्ण लुक मिळत नाही. अशा परिस्थितीत, लोक जास्त पावडर लावतात.
जर तुमची त्वच्या जास्त ऑयली असेल तर, काहि घरगुती फेस पॅक बनवून तुम्ही लावू शकता.
बेसन चेहऱ्यावरील तेल शोषून घेण्याचे काम करते. बेसनमध्ये गुलाबजल मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवून टाका.
टॉमेटोचा रस काढून घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. हा फेसपॅक लावल्याने त्वचा क्लीन आणि ऑईल फ्री होईल.
एका वाटीत दही घ्या. दह्यात ओट्स मिक्सरमध्ये बारिक करुन टाका. हि पेस्ट फेसपॅक प्रमाणे जाड करा आणि चेहऱ्यावर लावा.
१ चमचा अॅलोव्हेरा जेलमध्ये १ चमचा मध मिक्स करा आणि ते चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटानंतर पाण्यानी चेहरा धुवा.
मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी किंवा चंदन मिक्स करा आणि हा पॅक चेहऱ्यावर लावा. मुलतानी माती त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.