Hair Care : घरगुती उपायांनी करा पांढरे केस काळे, जाणून घ्या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पांढरे केस

ताणतणाव, पोषणाची कमतरता, रासायनिक प्रॉडक्ट्स आणि हार्मोनल बदलांमुळे केस आजकाल लवकर पांढरे होण्यास सुरुवात होते.

White Hair | GOOGLE

आवळा

आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन C असते. आवळ्याचा तेल किंवा पावडर नियमित वापरल्याने केस मजबूत होतात आणि केस काळे होण्यास मदत होते.

Amla | GOOGLE

नारळ तेल आणि कढीपत्ता

एक कढई घ्या. त्यात नारळ तेल टाकून कढीपत्ता तेलात टाका आणि चांगले उकळून घ्या. हे तेल थंड झाल्यावर केसांना लावा. हा उपाय केसांना नैसर्गिक काळेपणा देतो.

Coconut Oil | GOOGLE

मेहंदीचा वापर

मेहंदी ही केसांना नेहमीच नैसर्गिक रंग देते. मेहंदीमध्ये कॉफी किंवा चहापावडर मिक्स करुन लावल्यास केसांना नैसर्गिक काळी शाईनिंग मिळते.

Hair Mehandi | GOOGLE

काळा चहा पाणी

काळा चहा उकळून थंड करा आणि तो गाळून घ्या. केस धुतल्यानंतर शेवटी केसांवर काळा चहा ओता. केसांचा रंग गडद दिसतो.

Black Tea Water | GOOGLE

आहारात बदल

केस काळे ठेवण्यासाठी लोह, झिंक, प्रोटीन आणि व्हिटॅमिन B12 असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

Protein | GOOGLE

ताणतणाव कमी करणे

योग्य व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेतल्याने हार्मोन संतुलीत राहतात आणि केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.

Stress | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Doctor | GOOGLE

Hair Care : केसांना लावलेली मेहंदी लवकर फिक्की पडते? मग काय करावे जाणून घ्या

Hair Mehndi Color | GOOGLE
येथे क्लिक करा