ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वांगे ही सहज बाजारात उपलब्ध होणारी भाजी असून तिच्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवता येतात. जाणून घ्या आणि लगेचच बनवा वांग्याच्या ५ खास, सोप्या आणि चविष्ट रेसिपी.
ही भाजी रोजच्या जेवणासाठी बनवली जाते. चिरलेले वांगे मोहरी, जिरे, कांदा, हळद, मसाले घालून परतून शिजवले जाते. चपातीसोबत वांग्याची भाजी खूप छान लागते.
वांग्याचे तुकडे केल्यानंतर ते काळवंडू नयेत म्हणून चिरल्यानंतर वांग्यांच्या तुकड्यांना मीठ लावून ठेवावे.
भाजलेले वांगे, कांदा, टोमॅटो आणि मसाले मिसळून बनवलेले भरित अप्रतिम लागते. भाकरीसोबत हे भरित चवीने खाल्ले जाते.
कोळश्यावर किंवा चुलीवर भाजलेले वांगे घेतल्यास भरिताला स्मोकी फ्लेवर येतो. तसेच कच्चा लसूण आणि हिरव्या मिरचीमुळे भरिताची चव अधिकच चवदार लागते.
वांग्याचे पातळ गोल तुकडे कापून घ्या. काप फ्राय करण्यासाठी मसाले तयार करुन घ्या. कापलेले वांगे मसाल्यात डिप करुन तव्यावर किंवा तेलात तळा. हे काप जेवणात साइड डिश म्हणून फारच चविष्ट लागतात.
वांग्यात हरभरा किंवा चणाडाळ घालून झणझणीत सुक्की उसळ बनवली जाते. कोकणात हा प्रकार मोठ्या प्रमाणात बनवला जातो.
वांगे, गोडा मसाला आणि चिंच-गूळ घालून बनवलेली वांग्याची आमटी छान लागते. भातासोबत ही आमटी खूप रुचकर लागते आणि पोटभर जेवण होते.