ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल लोकांना घरी मिठाई बनवायलाही खूप आवडू लाागले आहे. घरगुती मिठाईमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते आणि ती कोणत्याही भेसळीपासून बनलेली नसते.
जाणून घ्या दुधापासून बनवलेल्या काही पदार्थांबद्दल जे तुम्ही घरी सहज बनवू शकता.
तुम्ही दुधापासून बर्फी बनवू शकता. दुधाची बर्फी बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही त्यावर पिस्त्याचा वापर करून सजवू शकता.
रस मलाईमध्येही दुधाचा वापर केला जातो. त्यात दुधाने बनवलेला पाक आणि स्पंजसारख्या गोड गोळ्या टाकल्या जातात.
शाही तुकडा हा दुधापासून बनवलेला आणखी एक गोड पदार्थ आहे. शाही तुकडा हा खाल्ल्याबरोबर तोंडात विरघळला जातो.
तुम्हाला मिठाई जास्त आवडत नसेल तर, तुम्ही शेवया बनवू शकता. शेवया दुधापासून बनवल्या जातात. शेवयांमध्ये तुम्ही ड्रायफुट्स आणि मलईसुध्दा टाकू शकता.
दुध आणि माव्याच्या साहाय्याने खीर बनवू शकता. भात आणि दुधापासून बनलेली खीर लोक आवडीने खातात.