Vishal Gangurde
अनेक जणांना बाजारात गेल्यावर मासे पाहून ताजे की शिळे हे समजत नाही.
शिळा मासा खाल्ल्याने व्यक्तीचे पोटही दु:खू शकतं.
शिळे मासे खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
ताज्या माशांचे डोळे हे चमकदार आणि फुगीर असतात. तसेच माशाच्या डोळ्यांवर पांढरे थर नसावेत.
बाजारात ताज्या माशांची त्वजा चमकदार आणि स्वच्छ दिसते. तसेच ताजा माशांची त्वचा कडक आणि खवलेयुक्त असते.
माशाचा रंग, डोळ्यांवर पांढरे थर नाहीत, कल्ले आणि शेपटी ताजे दिसत आहे का, याची खात्री करा.
माशांची फुफ्फुस तपासा
बाजारात मासे खरेदी करताना माशांचे कल्ले उचला. तसेच माशाच्या आतील भाग चमकदार लालसर गुलाबी रंगाचा आहे का ते तपासा.