Uttarakhand Tunnel: मजुरांचा पहिला फोटो आला समोर; कामगारांना 'या' ५ मार्गाने वाचवलं जाणार

Bharat Jadhav

राज्यमार्गाचं काम चालू

उत्तराखंडमधील उत्तरकाशीत यमनोत्री राष्ट्रीय राज्यमार्गाचं काम सुरू आहे. या अंतर्गत सिरक्यारा ते डंडालगावापर्यंत बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे.

Uttarakhand Tunnel | yanddex

किती मजूर अडकलेत

काम चालू असताना बोगद्याचा काही भाग कोसळला यात ४१ मजूर अडकले आहेत. साडेचार किमी लांब बोगद्याचा जवळपास १५० मीटर भाग कोसळला आहे.

Uttarakhand Tunnel | yandex

१० दिवसांपासून मजूर अडकलेत

४१ मजुरांना अडकून १० दिवस झाले आहेत. दरम्यान बोगद्याचा काही भाग कोसळल्याचं समजाताच बचाव पथकाकडून कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Uttarakhand Tunnel | yandex

पहिला फोटो आला समोर

दहा दिवसानंतर बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे पहिला व्हिडिओ समोर आलाय.

Uttarakhand Tunnel | yandex

सर्व कामगार सुरक्षित

इनडोस्कोप कॅमेरा कामगारांपर्यंत पोहोचला असून त्यातून कामगारांचा पहिला व्हिडिओ समोर आलाय. बचाव पथकाकडून कामगारांशी संपर्क केला जात आहे.

Uttarakhand Tunnel | yandex

मजुरांना ५ मार्गाने वाचवण्याचं काम चालू

बोगद्यात अडकलेल्या मजुरांना गेल्या १० दिवसापासून वाचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मजुरांना ६ इंच पाईपद्वारे अन्न आणि औषधं दिली जात आहेत.

Uttarakhand Tunnel | yandex

५ एजन्सींना दिलाय टास्क

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC), सतलुज हायड्रोपॉवर कॉर्पोरेशन (SJVNL), रेल विकास निगम लिमिटेड (RVNL), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL), आणि टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (THDCL) या पाच संस्थांना बचाव कार्याची जबाबदारी दिलीय.

Uttarakhand Tunnel | yandex

खोदकाम केलं जाणार

बोगद्यात अडकलेल्या मुजुरांची सुटका करण्यासाठी सतलज जल विद्युत निगमकडून बोगद्याच्या वरून उभ्या खोदकाम केलं जात आहे.

Uttarakhand Tunnel | yandex

रेल्वे विकास निगमचं काम सुरू

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने एका दिवसात एक अप्रोच रोड पूर्ण केलं. त्यानंतर रेल्वे विकास निगमने अत्यावश्यक पुरवठ्यासाठी दुसर्‍या उभ्या पाईपलाइनचे काम सुरू केलं.

Uttarakhand Tunnel | yandex

ओएनजीसीचा टास्क

डीप ड्रिलिंगमध्ये एक्सपर्ट असलेल्या ओएनजीसीने दुसऱ्या टोकापासून व्हर्टिकल ड्रिलिंगचे काम सुरू केलंय.

Uttarakhand Tunnel | yandex

ड्रिलिंगचं काम सुरू

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास संस्थेकडून सुरक्षा व्यवस्थेवर काम झाल्यानंतर मुख्य सिल्क्यरा टोकापासून ड्रिलिंग सुरू करत राहील. हे सुलभ करण्यासाठी लष्कराने बॉक्स कल्व्हर्ट तयार केलाय. मजुरांचं संरक्षण होण्यासाठी केनोपी बनवलं जात आहे. टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सूक्ष्म बोगद्यावर काम करेल. यासाठी अवजड यंत्रसामग्री जमा केली आहेत.

Uttarakhand Tunnel | yandex

हेही वाचा -

येथे क्लिक करा

गूगलवर या गोष्टी चुकूनही सर्च करू नका