ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयुष्यात आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला तरुण वयापासूनच पैशांचे नियोजन करण्याची गरज असते.
भविष्यात पैशांची अडचण भासू नये म्हणून योग्य नियोजन करणे कायम महत्त्वाचे असते.
मात्र अनेकांना पैशांचे योग्य नियोजन करणे जमत नाही,त्यासाठी खाली दिलेल्या टीप्सची तुम्हाला नक्की मदत होईल.
तरुण वयातच प्रत्येकाने काही पॉलिसी खरेदी कराव्यात,ज्याचा फायदा तुम्हाला नंतर जाऊन मिळतो.
कार किंवा घर खरेदीसाठी अनावश्यक कर्ज घेतात,त्यावेळी तुम्ही गरज नसल्यास पर्सनल लोन घेणे टाळावे.
कायम महिन्याच्या उत्पनातून काही पैसे वाचवून त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी.
तुम्ही म्युच्युअल फंड किंवा पीपीएफ मध्ये ही पैसे जमा करू शकता,याचा फायदा तुम्हाला नंतर होईल.
आजारपणात किंवा भविष्यात नोकरी गेल्यास अशा स्थितीमध्ये कायम ईमर्जन्सी फंडमधील पैसे उपयोगाला येतात.