Chetan Bodke
आपल्या एव्हरग्रीन सौंदर्यामुळे नेहमीच धकधक गर्ल माधुरी दीक्षित चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
नुकतंच माधुरीने सोशल मीडियावर सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.
सध्या माधुरीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
फॅन्सी टॉप आणि लेहेंगा वेअर करत माधुरीने हटके फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलेले आहे.
अभिनेत्रीच्या निखळ सौंदर्याने आणि क्यूट स्माईलने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
धकधक गर्लच्या नव्या या फोटोंवर लाखो लाईक्स मिळाले असून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
माधुरीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
म्हणूनच आजही माधुरी तिच्या खास अदांनी चाहत्यांना वेड लावत असते.
अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत माधुरीने जगभरात लोकप्रियता मिळवली.