Saam Tv
हे ७ फायबरयुक्त पदार्थ आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. जर तुम्ही या पदार्थांचा आहारात समावेश केला, तर तुमची पचनसंस्था उत्तम राहील.
चिया बियाण्यांमध्ये फायबर, प्रथिने , कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक घटक असतात.याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
उडद, तूर, मूग, मसूर किंवा चण्याची डाळ अत्यंत पौष्टिक असते. या डाळींमध्ये आहारातील फायबर, वनस्पती-आधारित प्रथिने ,लोह , फोलेट , पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते आणि पोट भरल्यासारखे वाटते.
रासबेरीमध्ये डायटरी फायबर, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पॉलीफेनॉल्स आणि अँथोसायनिन यांसारखे अँटिऑक्सिडंट्स तसेच भरपूर पाणी असते. यामध्ये असलेले फायबर आतड्यांमधील चांगल्या जिवाणूंना पोषण देण्यास मदत करते. यामुळे पचनक्रिया सुधारते.
अव्होकाडोला सुपरफ्रूट मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी, ई, के, बी६, फोलेट, भरपूर प्रमाणात डायटरी फायबर आणि पोटॅशियम असते. अव्होकाडोमधील हेल्दी फॅट्स शरीराला ऊर्जा देतात.
ओट्समध्ये भरपूर फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, लोह आणि व्हिटॅमिन बी१ असते. ओट्समध्ये आढळणाऱ्या 'बीटा-ग्लूकन' नावाच्या फायबरमुळे आतड्यांतील गुड बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. हे फायबर पचल्यानंतर आतड्यांसाठी फायदेशीर असते. जे आतड्यांचे आरोग्य उत्तम ठेवतात.
नाशपाती हे असे फळ आहे ज्यामध्ये पाणी आणि फायबर दोन्ही चांगल्या प्रमाणात असतात. हे फळ सालीसहित खाल्ल्यास अधिक फायबर मिळते.नाशपातीमधील पेक्टिन नावाचे फायबर आणि सॉर्बिटॉल आतड्यांची स्वच्छता करण्यास आणि मलमूत्र नरम करण्यास मदत करतात.
काबुली चणा हा प्रथिनांचा आणि फायबरचा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि आतड्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणत्याही विशेष आरोग्य समस्येसाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
NEXT : रिकाम्या पोटी आवळा, बीट अन् गाजराचा ज्यूस प्यायलात तर काय होईल? वाचा