Shreya Maskar
मेथी कढी बनवण्यासाठी आंबट दही, बेसन, मेथी, लसूण, कांदा, मेथी दाणे,सुकी मिरची आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
आले, लसूण, हिरवी मिरची पेस्ट, हिंग, हळद, धणेपूड, मेथी, मीठ, जिरे, मोहरी, लाल मिरची पावडर इत्यादी मसाले लागतात.
मेथीची कढी बनवण्यासाठी आंबट दही, बेसन आणि पाणी एकत्र करून घ्या.
नंतर पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आले, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घालून परतून घ्या.
आता या मिश्रणात हिंग, हळद, धणेपूड आणि चिरलेली मेथी घालून ५ मिनिटे शिजू द्या.
या मिश्रणात मसाला आणि चवीनुसार मीठ घाला.
कढीला फोडणी देण्यासाठी छोट्या पॅनमध्ये तेल घालून त्यात जिरे, धणे, मोहरी, सुकी मिरची, लसूण, कांदा आणि कसुरी मेथी घालून मिक्स करा.
कढीला एक उकळी आल्यावर गरमागरम भातासोबत त्याचा आस्वाद घ्या.