Manasvi Choudhary
स्वयंपाकघरात बडीशेपचा वापर केला जातो. पण बडीशेप केवळ पचनासाठीच नव्हे, तर आरोग्यासोबतच केस आणि त्वचेसाठीही अत्यंत गुणकारी मानली जाते.
बडीशेपच्या पाण्याचे केसांसाठी आणि त्वचेसाठी नेमके काय फायदे आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
बडीशेपचे पाणी शरीरासाठी एक उत्तम डिटॉक्स ड्रिंक मानले जाते. हे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरूमे , पिंपल्स आणि काळे डाग हळूहळू कमी होतात.
बडीशेपच्या पाण्यातील अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म त्वचेच्या पेशींचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करतात. तसेच यातील व्हिटॅमिन सी त्वचेवरील सुरकुत्या कमी करून त्वचा टवटवीत आणि तरुण ठेवण्यास मदत करते.
बडीशेपचे पाणी नियमित प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. तसेच हे पाणी शरीरातील पाण्याची कमतरता भरून शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
बडीशेपमध्ये लोह , मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. हे सर्व घटक केसांच्या मुळांना आतून मजबूत करतात आणि केसगळती रोखण्यास मदत करतात.
बडीशेपच्या पाण्यातील पौष्टिक घटकांमुळे केसांची वाढ झपाट्याने होते आणि केस निरोगी राहतात. हे पाणी केसांना आतून पोषण देते, ज्यामुळे केस मऊ, मुलायम आणि चमकदार बनतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.