Manasvi Choudhary
बडीशेप आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात तुम्ही आरोग्यासाठी फायदेशीर बडीशेप सरबत पिऊ शकता.
बडीशेप सरबत प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते.
बडीशेप सरबत घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही अगदी सहज पद्धतीने घरीच बडीशेप सरबत बनवू शकता.
बडीशेप सरबत बनवण्यासाठी बडीशेप, वेलची, साखर, बर्फ, दूध, सब्जा हे साहित्य एकत्र घ्या.
सर्वातआधी एका भांड्यामध्ये बडीशेप निवडून घ्या त्यात थोडे पाणी मिक्स करून चार ते पाच तास भिजत घाला. बडीशेपमध्ये वेलची देखील भिजत घाला.
हे मिश्रण चांगले उकळून द्या नंतर गॅसवर बंद करा थंड होऊद्या. त्यानंतर एका ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाका आणि त्यावर तयार केलेले बडीशेप सरबत ओता.