Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात मात्र तुम्हाला माहितीये का? अनेकदा पुरेशी झोप घेतल्यानेही थकवा जाणवतो.
८ तास पूर्ण झोपूनही सकाळी उठल्यावर थकवा किंवा आळस येतो याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. मात्र हे चुकीचे आहे. यामागची नेमकी कारणे कोणती आहेत ते जाणून घ्या.
शरीरातील हार्मोन्स सर्व कार्य नियंत्रित करतात आणि त्यांच्यात असंतुलन निर्माण झाल्यास थकवा व आळस वाटू शकतो.
जोरात घोरल्याने झोपेत अडथळा येतो आणि झोपेत श्वास घेण्याची प्रक्रिया काही काळ थांबते यामुळे रात्रीची झोप पूर्ण होऊनही सकाळी थकवा जाणवतो.
थायरॉईडमुळे कितीही झोप घेतली तरी शरीरात ऊर्जा राहत नाही आणि सतत थकवा जाणवतो.
मानसिक आरोग्य आणि झोप यांचा थेट मेंदूशी संपर्क असतो. यासाठी शरीराला शांत झोप मिळाली नाही की शरीर थकल्यासारखे वाटते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.