ऐश्वर्या रॉय ते दीपिका पादुकोण, तुमच्या लाडक्या अभिनेत्रींचे 'डॅडी' कोण? 5 फोटो पाहा

Manasvi Choudhary

फादर्स डे

जून महिन्यातला 3 रा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. आज २१ जून सर्वत्र फादर्स डे साजरा होत आहे.

Father's Day 2026

कलेचा वारसा

वडील हे प्रत्येकाच्याच आयुष्यातील पहिले हिरो असतात. बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यशामागेही वडिलांचा वाटा मोठा आहे. अनेक अभिनेत्री त्यांच्या कार्याचे श्रेय वडिलांना देतात.

Father’s Day | pintrest

सेलिब्रिटी फोटो

याचनिमित्त आज ऐश्वर्या रॉय ते दीपिका पादुकोण तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींचे वडिलासोबतचे फोटो पाहूया.

Bollywood Actress Fathers Photos | Instagram

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या रायच्या वडिलांचे नाव कृष्णराज राय आहे. तिचे वडील आर्मीमध्ये बायोलॉजिस्ट होते. ऐश्वर्या राय नेहमीच वडिलांच्या खूप जवळची होती. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम वडिलांसोबतचे फोटो शेअर आठवणींना उजाळा देत असते.

Aishwarya Rai Bachchan

दीपिका पादुकोण

दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण हे भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू आहेत. दीपिकाला खेळाची आणि शिस्तीची आवड तिच्या वडिलांकडूनच मिळाली आहे.

Deepika Padukone

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्माचे वडील भारतीय सैन्यात कर्नल होते. तिच्या वडीलांचे नाव अजय कुमार शर्मा आहे. अनुष्का तिच्या यशाचे श्रेय तिच्या वडिलांना देते.

Anushka Sharma

सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि राजकारणी शत्रूघ्न सिन्हा यांची मुलगी आहे.

Sonakshi Sinha

पूजा हेगडे

साऊथ आणि बॉलिवूड गाजवणारी पूजा हेगडे तिच्या वडिलांना तिचा सर्वात मोठा मार्गदर्शक मानते. पूजा हेगडेच्या वडिलांचे नाव मंजुनाथ हेगडे आहे. सोशल मीडियावर पूजा तिच्या वडिलांसोबतचे फोटो कायम शेअर करत असते.

Pooja Hegde

जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर ही प्रसिद्ध चित्रपट निर्मात बोनी कपूर यांची मुलगी आहे. जान्हवी ही वडिलांच्या खुप जवळची आहे. आई श्री देवी यांच्य निधनानंतर बोनी कपूर यांनी मुलींचा सांभाळ केला.

Janhvi Kapoor

आलिया भट्ट

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांची मुलगी अभिनेत्री आलिया आहे. अभिनेत्री आलियाला कलेचा वारसा वडिलांकडून मिळाला आहे.

Alia Bhatt

NEXT: तुमच्या पायांमध्ये 'ही' लक्षणे दिसल्यास समजा काहीतरी गडबड आहे; घरीच करा 'हे' ५ सोपे व्यायाम

Leg
येथे क्लिक करा...