Manasvi Choudhary
वजन वाढणे ही अत्यंत गंभीर समस्या आहे. वेळीच यावर उपाय ने केल्यास तुम्हाला गंभीर आजारांना सामोरे जावेल लागते.
शरीरावर वजन वाढले की पोटावर चरबी दिसून येते. पोटावर चरबी ही केवळ जास्त खाण्यामुळे होतेच असं नाही.
पोटावर चरबी साचणे हे शरीरात कमतरता असण्याचे संकेत असू शकते.
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर मेटाबॉलिझम मंदावतो शरीर कॅलरीज बर्न करण्याऐवजी पोटावर चरबी येते.
आहारात पुरेसे प्रोटीन नसेल तर सारखी सारखी भूक लागते आणि आपण गरजेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट्स किंवा गोड पदार्थ खातो.
तुम्हाला माहितीये का? झोपेच्या कमतरतेमुळे देखील वजन वाढण्याची समस्या उद्भवते.नियमितपणे ७ ते ८ तासांची झोप शरीरासाठी आवश्यक आहे.
शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मॅग्नेशियम महत्त्वाचे असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.