Fashion Tips: कमी खर्चातही दिसाल एकदम क्लासी! ऑफिस किंवा समारंभात 'या' ७ स्टायलिंग टिप्सने मिळेल ग्लॅमरस लूक

Shruti Vilas Kadam

कपड्यांची फिटिंग योग्य ठेवा

कपडे खूप सैल किंवा खूप टाइट असतील तर लुक बिघडू शकतो. जुन्या कपड्यांनाही योग्य फिटिंग आणि स्टायलिंग करून आकर्षक लुक देता येतो. थोडे सैल कपडे बेल्ट किंवा योग्य पद्धतीने टक करून स्टाइल करू शकता.

Fashion Tip

रंगांची निवड विचारपूर्वक करा

क्लासी लुकसाठी अनेक रंग एकत्र करण्याची गरज नाही. व्हाइट, ब्लॅक, बेज, नेव्ही ब्लू, ग्रे आणि ब्राउनसारखे बेसिक रंग एकमेकांसोबत पेअर करा. सिंपल आउटफिटसोबत एक स्टेटमेंट कलरही उठून दिसतो.

Fashion Tip

कपडे व्यवस्थित प्रेस करा

कपड्यांवर सुरकुत्या असतील तर महागडा आउटफिटही फारसा आकर्षक दिसत नाही. त्यामुळे बाहेर जाण्यापूर्वी कपडे व्यवस्थित प्रेस करा. साधे कपडेही प्रेस केल्यावर अधिक नीटनेटके आणि प्रीमियम दिसू शकतात.

Fashion Tips

अ‍ॅक्सेसरीजमध्ये साधेपणा ठेवा

क्लासी दिसण्यासाठी भरपूर ज्वेलरी घालण्याची गरज नाही. तुमच्याकडील जुने घड्याळ, छोटे ईअररिंग्स, सिंपल ब्रेसलेट किंवा आवडती बॅग वापरू शकता. ‘लेस इज मोअर’ हा फॉर्म्युला लक्षात ठेवा.

Fashion Tip

शूज आणि बॅग स्वच्छ ठेवा

आउटफिट कितीही सुंदर असला तरी अस्वच्छ शूज किंवा अस्ताव्यस्त बॅगमुळे संपूर्ण लुक खराब होऊ शकतो. त्यामुळे जुने शूज आणि बॅग स्वच्छ करून आउटफिटसोबत योग्य पद्धतीने मॅच करा.

Fashion Tip | Saam Tv

केसांची स्टाइल नीट ठेवा

क्लासी लुक केवळ कपड्यांमुळे तयार होत नाही. स्वच्छ केस आणि व्यवस्थित हेअरस्टाइल तुमच्या लुकमध्ये मोठा बदल घडवू शकते. यासाठी महागड्या सलून ट्रीटमेंटची गरज नाही.

Fashion Tip

बेसिक ग्रूमिंगकडे लक्ष द्या

स्वच्छ नखे, नीटनेटके केस आणि वैयक्तिक स्वच्छता यामुळे साधा लुकही अधिक आकर्षक दिसतो. घरच्या घरी बेसिक ग्रूमिंग करूनही तुम्ही स्वतःचा लुक एलिगंट आणि सुसज्ज ठेवू शकता.

Fashion Tip

Periods Pain: मासिक पाळी उशीरा येते? वेदना सहन होत नाहीत? मग PCOD नाही असू शकतो 'हा' आजार

Periods Pain | Saam Tv
येथे क्लिक करा