Siddhi Hande
उपवासाला नेहमीची साबुदाणा खिचडी आणि बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी.
उपवासाला तु्म्ही फराळी चिवडा बनवू शकतात. फराळी चिवडा बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे.
जाड किसलेला बटाटा, शेंगदाणे, काजू,बदाम, कढीपत्ता, हिरवी मिरची, पिठीसाखर, सैंध मीठ, तेल
सर्वात आधी बटाटे सोलून मोठ्या किसणीने किसून घ्या.हा किस पाण्यात टाका.
बटाट्याचा किस पाण्यात ठेवा जेणेकरुन काळा पडणार नाही.
यानंतर किस २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्या. कापडावर पसरवून १५-१० मिनिटे चांगला सुकवून घ्या.
यानंतर कढईत तेल गरम करा. त्यामध्ये हा किस टाकून तळून घ्या.
यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता तळून घ्या.
यानंतर तळलेले बटाटे, शेंगदाणे आणि कढीपत्ता मोठ्या भांड्यात एकत्र करा.
यानंतर चिवडा गरम असतानाच त्यात मीठ आणि पीठीसाखर टाकून मिक्स करा.
तुम्ही हा फराळी चिवडा उपवासाला खाऊ शकता. जर तुम्ही कढीपत्ता टाकला नाही तरी चालेल.