Fansachi Bhaji Recipe: कोकणी स्टाईल फणसाची भाजी खायचीये? फॉलो करा ही पद्धत

Sakshi Sunil Jadhav

फणसाची भाजी

कच्च्या फणसाची कोकणी पद्धतीची भाजी चविष्ट, मसालेदार आणि नारळाच्या स्वादाने भरलेली असते. कोकणात ही भाजी खूप प्रसिद्ध आहे.

Fansachi Bhaji Recipe

लागणारे साहित्य

500 ग्रॅम कच्चा फणस, 1 कप ताजा किसलेला नारळ, 2 कांदे, 4-5 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं 2 ते 3 सुकी लाल मिरची, 1 चमचा धणे, पाव चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 2 चमचे तेल, चवीनुसार मीठ, कोथिंबीर सजावटीसाठी इ.

Konkani Jackfruit Curry

फणस तयार करा

सर्वप्रथम कच्च्या फणसाचे मध्यम आकाराचे तुकडे करून स्वच्छ धुवा. त्यानंतर थोडं मीठ आणि हळद घालून 10 मिनिटं उकळून घ्या.

Konkani Jackfruit Curry

मसाला भाजून घ्या

कढईत धणे, जिरे, सुकी लाल मिरची आणि अर्धा नारळ हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

Raw Jackfruit Recipe

मसाला वाटून घ्या

भाजलेले मसाले, आले आणि लसूण थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.

Raw Jackfruit Recipe

फोडणी द्या

कढईत तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि चिरलेला कांदा घाला. कांदा सोनेरी होईपर्यंत परता.

Raw Jackfruit Recipe

वाटलेला मसाला परता

कांदा परतल्यावर तयार मसाला घालून 3-4 मिनिटे चांगला परता. त्यात हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करा. उकडलेले फणसाचे तुकडे मसाल्यात घालून हलक्या हाताने मिसळा.

Raw Jackfruit Recipe

मसाले मिसळा

त्यात हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करा. उकडलेले फणसाचे तुकडे मसाल्यात घालून हलक्या हाताने मिसळा. उरलेला किसलेला नारळ व अर्धा कप गरम पाणी घालून झाकण ठेवून 10-15 मिनिटे मंद आचेवर शिजवा.

Coconut Curry Recipe

सजवून सर्व्ह करा

भाजी शिजल्यावर वरून कोथिंबीर भुरभुरा आणि गरमागरम भाकरी, पोळी किंवा वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करा.

Konkani Jackfruit Curry | google

NEXT: जंजिरा किल्ल्यावर जाण्याचा प्लान करत असाल तर थांबा, ३ महिने किल्ला राहणार बंद

Janjira Fort news
येथे क्लिक करा