Manasvi Choudhary
सुप्रसिद्ध अभिनेत्री मिथिला पालकर सध्या तिच्या फॅशनमुळे प्रकाशझोतात आली आहे. मिथिलीने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये मिथिला खुपच सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याने नेटकऱ्यांना मोहिनी घातली आहे.
या सुंदर लूकमध्ये मिथिलाने ग्लोडन कलरची डिझायनर साडी परिधान केली आहे.
कपाळी टिकली, कुरळे केस आणि ओठांवर लिपस्टिक असा तिचा लूक आहे. साडीवर मॅचिंग तिने नेकलेस घातल आहे.
मिथिलाने प्लेन साडी नेसली असली तरी तिच्या ब्लाऊज स्टाईलने लक्ष वेधून घेतले आहे. स्लिव्हलेस डिपनेक ब्लाऊज तिने परिधान केला आहे.
या फोटोशूटमध्ये मिथिला खुपच उठून दिसत आहे. तिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं असून अनेकांनी फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर मिथिलाचे फोटो सध्या तुफान व्हायरल झाले आहेत.