Saam Tv
दादर स्टेशन आणि तिथले प्रसिद्ध हॉटेल्स हा मुंबई करांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
दादरमध्ये तुम्ही फक्त २० रुपयांत पोट भर नाश्ता करू शकता.
चहा आणि इतर नाश्त्यासाठी श्री दत्त टी सेंटरमध्ये १० रुपयात नाश्ता करता येतो.
महाराष्ट्रीयन पदार्थ खाण्यासाठी १०० रुपयात तुम्ही थाळी, पुरण पोळी असे अनेक पदार्थ खाऊ शकता.
सॅंडविच, पिझ्झा आणि शेक्स पिण्यासाठी बाबा सहगलचे फास्ट फुड फक्त ५० रुपयात खाऊ शकता.
शाकाहारी जेवणासाठी प्रसिद्ध Veggie Table हॉटेलमध्ये तुम्ही ८० ते १०० रुपयात जेवणाचा आस्वाद घेऊ शकता.
मऊ लुसलुशीत आणि घरगुती पदार्थांची चव घेण्यासाठी तुम्ही फक्त २० रुपयांत पराठे खाऊ शकता.
तुम्हाला इडली, पोहे, साबुदाण्याचे वडे असे नाश्त्याचे स्वस्तात मस्त आणि चमचमीत पदार्थ प्रकाश हॉटेलमध्ये मिळतील.
तुम्हाला सी फूड्स, मुघलाई, महाराष्ट्रीयन, नॉर्थ इंडियन असे विविध पदार्थ खायचे असतील तर गोमंतक हॉटेल हा उत्तम पर्याय आहे.