Manasvi Choudhary
पुणे हे पर्यटकांसाठी फिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोणत्याही महिन्यात पर्यटक पुण्यातील प्रसिद्घ ठिकाणांना भेट देतात.
पुण्याजवळील बारामती हे शहर पर्यटकांचे केंद्रबिंदू मानले जाते. तुम्हाला देखील पुण्यामध्ये फिरण्यासाठी यायचे असेल तर 5 ठिकाणांना नक्की भेट द्या
पुणे-बारामती मार्गावर असलेले मोरगाव येथील अष्टविनायकातील पहिले स्थान म्हणजे श्री मयूरेश्वर मंदिर आहे.
बारामतीतील मिनी भरतपूर हे महाराष्ट्रातील पर्यटकांचे प्रसिद्ध ठिकाण आहे.फ्लेमिंगो पक्षी पाहायला मिळतात. बोटिंगचा आनंद घेण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.
बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठानमधील 'जनवास्तु संग्रहालय' हे प्रसिद्ध आहे. येथे विविध ऐतिहासिक वस्तू, नाणी, जुनी भांडी आणि संस्कृती पाहायला मिळते.
बारामतीमधील श्रद्धेचे ठिकाण म्हणजे कन्हेरीचा मारूती. येथे पर्यटकांची गर्दी होते.
बारामतीकराचं भाग्य म्हणजे सोनगावमध्ये कन्हा आणि निरा नदीचा संगम झाला आहे. येथे प्राचीन काळातील शिव मंदीर आहे.