छातीत वारंवार दुखत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका; हा असू शकतो हार्ट अटॅकचा धोका

Manasvi Choudhary

शारीरिक दुखणे

आजकाल बदललेली जीवनशैली, कामाचा वाढता प्रभाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे अनेक गंभीर आजार उद्भवत आहे. अनेकदा शारीरिक दुखण्याकडे साधी समजून आपण दुर्लक्ष करतो मात्र याचा गंभीर परिणाम भोगावा लागतो.

Chest Pain Sign

हृदयविकाराचा धोका अधिक

सध्या हृदयविकाराचा धोका दिवसेदिवस वाढत चालला आहे. अशावेळी तुम्ही जर छातीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत असाल तर हे गंभीर कारण बनू शकते.

Chest Pain Sign

छातीत का दुखते?

छातीत दुखणे, सतत अस्वस्थ वाटणे हे कोणत्या आजाराची लक्षणे आहेत यामुळे काय होते हे या वेबस्टोरीतून समजून घ्या.

Chest Pain Sign

छातीत का दुखते?

जेव्हा हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होतो, तेव्हा छातीत दाब पडतो आणि कळा येतात.

Chest Pain Sign

हार्ट अटॅकची लक्षणे

छातीच्या मधोमध किंवा डाव्या बाजूला प्रचंड जड वाटणे

छातीतून कळा निघून त्या डाव्या हातामध्ये, मानेमध्ये, जबड्यात जाणवणे.

कोणतेही मेहनतीचे काम न करताना अचानक थंड घाम सुटणे आणि चक्कर आल्यासारखे वाटणे.

Heart Attack | pinterest

बसल्या जागी किंवा चालताना अचानक दम लागणे आणि श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण होणे.

अचानक प्रचंड अशक्तपणा जाणवणे किंवा छातीत मळमळल्यासारखे होऊन उलट्या होणे.

Chest Pain Sign

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXt: कमरेपर्यंत केस वाढवण्यासाठी महिलांनी करा ५ सोपे उपाय

Long Hair Care Tips
येथे क्लिक करा..