Facial Hair Removal: शेव्हिंग, वॅक्सिंग की लेझर? चेहऱ्यावरील नको असलेले फेशियल हेअरसाठी कोणता पर्याय आहे सेफ

Shruti Vilas Kadam

शेव्हिंग हा सोपा आणि वेदनारहित पर्याय

रेझरच्या मदतीने चेहऱ्यावरील केस पटकन काढता येतात. मात्र केस मुळापासून निघत नसल्याने काही दिवसांत पुन्हा वाढू शकतात.

facial hair removal women

शेव्हिंगमुळे केस जाड होत नाहीत

शेव्ह केल्यामुळे केस प्रत्यक्षात जाड किंवा अधिक काळे होत नाहीत. मात्र कापलेल्या केसांचे टोक बोथट असल्याने ते वाढताना जाड दिसू शकतात.

How To Remove Facial Hair

वॅक्सिंगमध्ये केस मुळापासून निघतात

वॅक्सिंगमुळे केस मुळासकट निघत असल्याने शेव्हिंगच्या तुलनेत परिणाम जास्त काळ टिकू शकतो. मात्र संवेदनशील त्वचेवर लालसरपणा किंवा जळजळ होऊ शकते.

Facial Hair Removal Tips

संवेदनशील त्वचेसाठी वॅक्सिंग काळजीपूर्वक करा

अतिसंवेदनशील त्वचा, अॅक्ने किंवा त्वचेची समस्या असल्यास वॅक्सिंगमुळे त्रास वाढू शकतो. त्यामुळे त्वचेचा प्रकार लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

facial hair removal women

लेझर हे दीर्घकाळासाठी प्रभावी ठरू शकते

लेझर हेअर रिमूव्हल केसांच्या मुळांवर लक्ष केंद्रित करते. केसांची वाढ दीर्घकाळासाठी कमी करण्यासाठी हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.

Facial Hair Removal

लेझरसाठी अनेक सिटिंग्स लागू शकतात

लेझर ट्रीटमेंटचा परिणाम एका सिटिंगमध्ये मिळत नाही. केसांची जाडी, त्वचेचा रंग आणि हार्मोनल घटकांनुसार अनेक सिटिंग्सची आवश्यकता असू शकते.

Facial Hair Removal Tips

त्वचेच्या प्रकारानुसार पर्याय निवडा

शेव्हिंग, वॅक्सिंग किंवा लेझर यापैकी कोणता पर्याय योग्य आहे हे त्वचेचा प्रकार, केसांची वाढ आणि संवेदनशीलता यावर अवलंबून असते. गरज असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Facial Hair Removal | Canva

Hair Care: शॉवरनंतर केसांची अशी घ्या काळजी; ओले केस गळणे आणि तुटणे होईल कमी

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा