Face Yoga Exercies: उन्हाळ्यात चमकदार त्वचा हवी? मग रोज हे 5 फेस योगा करा

Manasvi Choudhary

त्वचेची काळजी

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. उष्णता तसेच घाम आल्याने त्वचा काळी पडते.

Face Yoga Exercies

फेस योगा

उन्हाळ्यात तुम्हालाही चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर तुम्ही फेस योगा करणे महत्वाचे आहे.  यामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा घट्ट होऊन चमकू लागते.

Face Yoga Exercies

किस अँड स्माईल

किस अँड स्माईल या योगामध्ये चुंबन घेत असल्याप्रमाणे ओठ बाहेर काढा आणि मोठी स्माईल द्या यामुळे जबड्याची जाॅ लाईन सुधारते.

Face Yoga Poses

स्मिरेड स्माईल

ओठ दाताच्या मागे लपवा आणि 'O' असा आकार करा. त्यानंतर ओठ तसेच ठेवून शक्य तितके रुंद हसण्याचा प्रयत्न करा.

Face Yoga Poses

लायन पोज योगा

मोठी जीभ बाहेर काढा आणि जोरात 'हा' असा आवाज करत श्वास सोडा. डोळे उघडे ठेवून वरच्या दिशेला पहा. यामुळे चेहऱ्यावरील ताण कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारून त्वचा उजळते.

Face Yoga Exercies

फिश फेस योगा

तुमचे गाल आणि ओठ आतल्या बाजूला ओढून 'माशासारखा' चेहरा करा. याच स्थितीत हसण्याचा प्रयत्न करा. यामुळे चेहऱ्याचा पोत सुधारतो आणि त्वचा मऊ-गुळगुळीत होते.

Face Yoga Exercies

व्ही पोज योगा

दोन्ही हातांची मधली बोटे भुवयांच्या मधोमध ठेवा आणि तर्जनी डोळ्यांच्या बाहेरील टोकाला ठेवा. आता वरच्या दिशेला पहा आणि डोळे मिचकावण्याचा प्रयत्न करा.

Face Yoga Exercies

next; Bharli Mirchi Recipe: अस्सल गावरान स्टाईल भरली मिरची कशी बनवायची?

येथे क्लिक करा...