Sakshi Sunil Jadhav
स्वत:च्या त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली नाहीतर, काहीच कमी वयातच त्वचेवर सुरकुत्या आलेल्या पाहायला मिळतात.
सुरकुत्या आलेला चेहरा अजिबात पाहावासा वाटत नाही. कमी वयात ही समस्या असह्य होते.
अनेक लोक स्कीन टाइट करण्यासाठी महागड्या प्रोडक्टचा वापर करत असतात. मात्र त्याचा प्रभाव फार कमी काळ राहतो.
तुमच्यासाठी पुढे काही सोपे घरगुती उपाय दिले आहेत. ज्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च किंवा महागड्या प्रोडक्ट्सा वापर करावा लागणार नाही.
घरात एखादं अंड असेल तर त्यातला पांढरा भाग काढून चेहऱ्याला लावून मसाज करा. १५ मिनिटांनी चेहरा धुवून घ्या.
दही आणि मध मिक्स करुन १५ ते २० मिनिटे चेहऱ्याला लावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
केळ्याच्या फेसमास्कने चेहरा टाइट व्हायला खूप मदत होते. त्यासाठी केल्याची पेस्ट आणि मधाचा वापर करावा.
रोज रात्री झोपताना बदामाचे तेल चेहऱ्याला लावा. त्याने स्कीनमध्ये काहीच दिवसात तुम्हाला बदल जाणवेल.