Shruti Vilas Kadam
गाल आत ओढून 10-15 सेकंद धरून ठेवा. यामुळे गालावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
डोके वर करून छताकडे पाहा आणि ओठ पुढे करा. ही एक्सरसाइज डबल चिन कमी करण्यास मदत करते.
तोंड हलवत चघळण्यासारखी हालचाल करा. यामुळे जॉ लाइन टोन होते.
तोंडात हवा भरून गाल फुगवा आणि काही सेकंद ठेवा. यामुळे फेस मसल्स मजबूत होतात.
मोठ्याने हसा आणि काही सेकंद धरून ठेवा. यामुळे गाल टोन होतात.
मान हळूहळू गोल फिरवा. यामुळे मान आणि जबड्याजवळील चरबी कमी होण्यास मदत होते.
खालचा ओठ वर उचलून ठेवा. ही एक्सरसाइज फेस शेप सुधारण्यास मदत करते.