Alisha Khedekar
आहार आणि नियमित व्यायामाच्या मदतीने शरीरातील अतिरिक्त कॅलरी कमी करा. त्यामुळे हळूहळू चेहऱ्यावरील चरबीही कमी होण्यास मदत होते.
पॅकेज्ड आणि प्रोसेस्ड पदार्थांऐवजी भाज्या, फळे, डाळी, कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांचा आहारात नियमित समावेश करा.
फॅट लॉससाठी व्यायाम सातत्याने करणे महत्त्वाचे आहे. चालणे, धावणे किंवा कार्डिओसोबत स्ट्रेंथ ट्रेनिंगही फायदेशीर ठरते.
दररोज साधारण ७ ते ९ तासांची शांत आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. झोपेचा परिणाम वजनावरही होतो.
सततचा तणाव खाण्याच्या सवयी आणि झोप बिघडवू शकतो. त्यामुळे ध्यान, योग किंवा आवडत्या छंदांसाठी वेळ काढा.
अल्कोहोलमुळे अनावश्यक कॅलरी वाढू शकतात आणि शरीरात पाणी साचल्याने चेहरा काहीवेळा अधिक सुजलेला दिसू शकतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा