Shruti Vilas Kadam
हा DIY फेसवॉश तयार करण्यासाठी फक्त दोन चमचे तांदूळ, थोडे मध आणि गुलाबजल आवश्यक आहे. हे तीन पदार्थ त्वचेला जेंटली क्लीन करण्यास मदत करतात.
फेसवॉशसाठी बासमती तांदूळ न वापरता जाडसर आणि अनपॉलिश्ड तांदूळ वापरण्याचा सल्ला दिला आहे. दोन चमचे तांदूळ एका ग्लास पाण्यात साधारण २० ते २५ मिनिटे भिजत ठेवा.
भिजवलेले तांदूळ पाण्यासह मिक्सरमध्ये बारीक ब्लेंड करा. हे मिश्रण गाळून घ्या. त्यानंतर त्यात थोडे मध आणि गुलाबजल मिसळा. तुमचा राइस फेसवॉश तयार आहे.
जर त्वचेवर पिंपल्स किंवा अॅक्नेची समस्या असेल, तर मधाऐवजी एलोवेरा जेल वापरू शकता. मात्र, त्वचेची संवेदनशीलता लक्षात घेऊन वापरणे महत्त्वाचे आहे.
सर्वप्रथम चेहरा साध्या पाण्याने धुवा. त्यानंतर राइस फेसवॉश चेहऱ्यावर लावून १ ते २ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
फेसवॉश केल्यानंतर त्वचा कोरडी पडू नये यासाठी चांगला मॉइश्चरायझर लावण्याचा सल्ला दिला आहे. नियमित क्लींजिंगमुळे त्वचेवरील धूळ, घाण आणि अतिरिक्त तेल दूर करण्यास मदत होते.
हा घरगुती फेसवॉश नैसर्गिक असल्यामुळे तो फक्त १ ते २ दिवस वापरणे योग्य आहे. तो नेहमी फ्रिजमध्ये ठेवावा. वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी; लालसरपणा किंवा अॅलर्जी जाणवल्यास वापर थांबवा.