Face Care: चेहऱ्यावर नॅचलर ग्लोसाठी पार्लरला कशाला जायचं? वापरा 5 मिनिटात घरी तयार होणारी ही पेस्ट

Shruti Vilas Kadam

त्वचेला नैसर्गिक थंडावा मिळतो

काकडी आणि अ‍ॅलोवेरा दोन्हीही त्वचेला थंडावा देतात. उन्हाळ्यात किंवा उन्हामुळे झालेली त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी हा नैसर्गिक उपाय खूप फायदेशीर ठरतो.

Face Care | Saam Tv

त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत

काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते, तर अ‍ॅलोवेरा त्वचेला खोलवर मॉइश्चर देतो. त्यामुळे त्वचा मऊ, तजेलदार आणि हायड्रेट राहते.

Face Care | Saam Tv

पिंपल्स आणि डाग कमी होण्यास मदत

अ‍ॅलोवेरामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, तर काकडी त्वचा शांत ठेवते. त्यामुळे पिंपल्स आणि त्यांचे डाग कमी होण्यास मदत होते.

Face Care

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी उपयुक्त

डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी काकडी आणि अ‍ॅलोवेरा जेल लावणे फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि सूजही कमी होते.

Face Care

त्वचा उजळ आणि ताजीतवानी दिसते

काकडी आणि अ‍ॅलोवेराचा नियमित वापर केल्यास त्वचेतील मृत पेशी कमी होतात आणि चेहरा अधिक फ्रेश व ग्लोइंग दिसू लागतो.

Face care | Saam Tv

काकडी-अ‍ॅलोवेरा फेसपॅक कसा तयार करावा

एक लहान काकडी किसून घ्या आणि त्यात १-२ चमचे अ‍ॅलोवेरा जेल मिसळा. हे मिश्रण चांगले एकजीव करून फेसपॅक तयार करा.

Face Care

वापरण्याची योग्य पद्धत

तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर 15-20 मिनिटे लावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय केल्यास त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.

Face Care | Saam tv

Arjun Tendulkar Wedding: ऐश्वर्या राय ते शाहरुख खान...; अर्जुन तेंडुलकर-सानियाच्या लग्नाला सेलिब्रिंटींची लगबग

Arjun Tendulkar Wedding
येथे क्लिक करा