Shruti Vilas Kadam
मेथी दाणे आणि कच्चं दूध हे मुख्य साहित्य लागते. हे दोन्ही घटक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
मेथी दाणे ३-४ तास दुधात भिजवून ठेवा. नंतर त्याची बारीक पेस्ट तयार करा.
तयार पेस्ट चेहऱ्यावर फेसपॅकप्रमाणे लावा आणि सुमारे २०-३० मिनिटं ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
मेथीत अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि एजिंगचे लक्षण कमी होण्यास मदत होते.
मेथीतील अँटीबॅक्टेरियल गुण पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि डाग कमी करण्यात मदत करतात.
दूध नैसर्गिक क्लिन्झरप्रमाणे काम करतं, डेड स्किन काढून त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवते.
हा फेसपॅक वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. संवेदनशील त्वचा असल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.