Face Care: चेहऱ्याला सॉफ्ट आणि मॉइश्चराइज ठेवायचंय? मग आठवड्यातून २ वेळा हा घरी बनवलेला मास्क नक्की लावा

Shruti Vilas Kadam

फेसपॅक कसा तयार करावा आणि वापरावा?

1 चमचा चंदन पावडर घ्या. त्यात 2 चमचे ताजे अॅलोवेरा जेल मिसळा. दोन्ही घटक एकत्र करून गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 15 ते 20 मिनिटे सुकू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा फेसपॅक वापरू शकता.

Face Care | Saam Tv

त्वचेला थंडावा मिळतो

अॅलोवेरा आणि चंदन या दोन्ही घटकांमध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते.

Face Care

पिंपल्स कमी करते

या फेसपॅकमधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरील जीवाणू कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होऊ शकते.

Face care | Saam TV

त्वचेची चमक वाढवते

नियमित वापरामुळे त्वचेवरील निस्तेजपणा कमी होऊन चेहरा अधिक तजेलदार आणि फ्रेश दिसू शकतो.

Face Care | Saam Tv

अतिरिक्त तेल कमी करते

तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी हा फेसपॅक फायदेशीर ठरू शकतो. तो त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यात मदत करतो.

Face Care | Saam tv

सनटॅन कमी करण्यास मदत

उन्हामुळे त्वचेवर आलेला टॅन कमी करण्यासाठी अॅलोवेरा आणि चंदन पावडर उपयुक्त मानली जाते.

Face care | Saam TV

त्वचा मऊ आणि हायड्रेटेड ठेवते

अॅलोवेरा त्वचेला नैसर्गिक आर्द्रता प्रदान करते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.

Face Care | Saam Tv

डाग आणि पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत

सतत वापर केल्यास चेहऱ्यावरील हलके डाग आणि असमान त्वचेचा रंग सुधारण्यास मदत मिळू शकते.

Face Care | Saam tv

Health Care: रोज रात्री झोपण्याआधी जिरा पाणी प्यायल्याने शरिराला मिळतात हे 7 आरोग्यदायी फायदे

Jeera Pani Benefits | Saam tv
येथे क्लिक करा