Shruti Vilas Kadam
बटाट्याच्या रसात नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, त्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग, टॅन आणि पिग्मेंटेशन हळूहळू फिकट होण्यास मदत होते.
नियमितपणे बटाट्याचा रस लावल्यास त्वचा नैसर्गिकरीत्या उजळते आणि चेहऱ्यावर फ्रेश ग्लो येतो.
बटाट्याच्या रसातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरूम निर्माण करणारे जंतू कमी करतात, त्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
थंड बटाट्याचा रस डोळ्यांखाली लावल्यास सूज आणि काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.
बटाट्याचा रस अतिरिक्त तेल शोषून घेतो, त्यामुळे तेलकट त्वचा संतुलित राहते आणि चेहरा चिकट वाटत नाही.
या रसामुळे त्वचेचे पोअर्स घट्ट होण्यास मदत होते, त्यामुळे त्वचा अधिक गुळगुळीत आणि टवटवीत दिसते.
बटाट्याचा रस हा घरगुती आणि नैसर्गिक उपाय असल्याने केमिकल प्रॉडक्ट्सपेक्षा सुरक्षित मानला जातो (संवेदनशील त्वचेसाठी आधी पॅच टेस्ट करावी.